नाशिक : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरीश निवृत्ती दिवटे वय ३ असं मयत मुलाचं नाव आहे. हरीश हा बहिणीसोबत खेळत होता, त्याचवेळी बिबट्याने पाठीमागून हल्ला करत त्याला जंगलात उचलून नेत ठार केलं. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेलुंजे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
सूत्रानुसार, सायंकाळच्या सुमारास बिबट्याने हरीश बहिणीसोबत घरात खेळत असताना उचलून नेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. बिबट्याने हरीशला उचलून नेले त्यावेळी त्याचे आजोबा गोठ्यात गाईचे दूध काढत होते. त्यांनी बघितल्यानंतर आरडा ओरड केली. हरीशला बिबट्याने उचलून नेल्यानंतर त्याचा गावात सर्वत्र शोध घेण्यात आला गावात कुठेही हरीश आढळून आला नाही.
मृतदेह गावा नजीकच्या जंगलात आढळला
त्यानंतर हरीशचा मृतदेह गावा नजीकच्या जंगलात आढळून आला. हरीशचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. सहा वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.