Nagpur Accident News: नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये एक मोठा अपघात घडला आहे. ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झालाय. ही घटना आज सकाळी घडली असून, ट्रॅव्हल्समध्ये एकूण ५२ विद्यार्थी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्समध्ये सरस्वती विद्या मंदिर येथील सातवी ते आठवीचे ५२ विद्यार्थी प्रवास करीत होते. वर्ध्यात ट्रेंनिगसाठी हे विद्यार्थी गेले होते. दरम्यान वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना नागपूर- वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक ट्रॅव्हल्स बस जंगल घाटामध्ये आली असता बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर नागपूरच्या एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले. यावेळी एक विद्यार्थिनी ला डॉक्टर ने मृत घोषित केले. इतरांवर उपचार सुरू आहेत.