नंदुरबार : भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वकिलासह एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भवर गावं ता. तळोदा, नंदुरबार येथे आज बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ऍड.निलेश वसावे वय ३६, रा. चिवलउतार, ता. अक्कलकुवा. आणि हांजा रुपा वसावे वय ३४ रा. वेली ता. अक्कलकुवा असे मयत दोघांचे नाव आहे. याप्रकणी अज्ञात चालकाविरुद्द तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा येथे ह.मु. आणि अक्कलकुव्यातील चिवलउतार येथील रहिवासी ऍड. निलेश वसावे हे त्यांच्या गावी चिवलउतार ता. अक्कलकुवा येथे काल दि.२७ डिसेंबर रोजी गेले होते. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास ऍड. निलेश वसावे आणि हांजा रूपा वसावे हे दोघ शाईन मोटार सायकल (क्रं.एमएच 39 एजी २५५२ ) ने तळोदा येथे परतत होते.
दरम्यान, भवर ता. तळोदा गावाजवळ अज्ञात वाहनावरील चालक (नाव गांव माहित नाही) याने अविचाराने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील वाहन हांजा यांच्या ताब्यातील शाईन मोटार सायकलला जबर धडक दिली. यात ऍड. निलेश पारता वसावे (वय ३६ वर्षे) रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ह.मु. विदयानगरी तळोदा, हांजा रुपा बसावे (वय ३४ वर्षे) रा. वेली ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार ह विदयानगरी तळोदा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी आसुबाई निलेश वसावे रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ह.मु. विद्यानगरी, तळोदा ता. तळोदा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोनि पंडितराव सोनवणे करीत आहेत. दरम्यान ऍड. निलेश पारता वसावे हे तळोदा न्यायालयात काम पाहत होते.