तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। राज्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. अशा तापमानामुळे उष्माघाताचे बळी वाढत आहे. जळगावमध्ये उष्माघातामुळे आणखी एकाचा बळी गेला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर पाटील यांचे वावडदा शिवारात शेत असून रात्री बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतातील कामे दिवसा करावी लागतात. या अनुषंगाने कमलाकर पाटील आणि त्यांच्या घरातील महिला यांनी दिवसभर काम केले. प्रचंड उन्हामुळे सायंकाळी त्यांना त्रास व्हायला लागला. सुरुवातीला त्यांना लिंबू पाणी देऊन उपचार केले. त्यानंतर त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कमलाकर पाटील हे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंच होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.
गावातील उपसरपंच यांचा मृत्यू झाल्याने शनिवारी गावातील सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.