---Advertisement---

दुर्दैवी! बिडगावच्या जवानाला गुहावटीत वीरमरण

by team

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथून जवळच असलेल्या बिडगाव येथील रहिवासी व‌ आयटीबीपीच्या सेवेत असलेल्या जवानाचा गुहावटी येथे उपचार घेतांना दृदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.६)घडली. तरूणाच्या या दृदैवी निधनाने गावासह परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवानावर गुरुवारी (ता.८) बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर असे की बिडगाव येथील हिरामण झावरु पाटील यांचा एकुलता एक मुलगा अशोक हिरामण पाटील (वय ३५) हे अरुणाचल प्रदेश येथील युपीया येथे इंडीयन तिबेट बार्डर फोर्स ३१ बटालीयन येथे सेवेत होते. त्यांना गेल्या पाच दिवसांपुर्वी डोक्यात त्रास होऊ लागल्याने व तब्येत खालावल्याने त्यांना आसाम येथील गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव गुवाटीहुन विशेष विमानाने हावडा तेथून इंदोर व मग शववाहीकेने राहत्या गावी बिडगाव येथे आणुन उद्या गुरुवारी (ता.८) दुपारपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. अशोक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---