दुर्दैवी ! क्लासला निघाली अन् रस्त्यातच मृत्यूनं गाठलं

जळगाव : क्लासला निघालेल्या विद्यार्थिनीचा पुलावरुन तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जामनेर शहरात मंगळवार, ३  रोजी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील खादगाव येथे पूनम ही आपल्या कुटुंबियांसह वास्तवाला होती. नेहमीप्रमाणे आज मंगळवार, ३  रोजी पूनम ही क्लासला निघाली होती. दरम्यान, ललवणी शाळे जवळील स्टॉप जवळ उतरून क्लाससाठी जात असताना तिचा पुलावर तोल गेला. यामुळे तिचा कांग नदीपात्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नाना साहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली.  तीन तासाच्या प्रयत्नानंतर तिचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला.मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याचे काम सुरु होते.