मुक्ताईनगर : ग्रामपंचायतींद्वारा मंजूर करण्यात आलेल्या घरकुल व गोठा प्रस्तावांना नाकारुन इतरांकडून आलेले प्रस्तावांना मंजूर केले जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे. पंचायत समितीत गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा निदर्शनास आल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवार, २४ रोजी थेट पंचायत समिती कार्यालयाला टाळा लावत गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा किंवा जिल्हा परिषदेत जमा केल्याशिवाय कुलूप उघडले जाणार नाही, अशी माहितीही मंत्री खडसे यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये बैठक बोलवली होती. या बैठकीत घरकुल व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला. मात्र , कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांकडून योजनांचा लाभ पैसे घेऊनच मिळत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यातच घरकुल कोठे ग्रामपंचायत कडून आलेले ठराव ते मंजूर न होता दुसऱ्या व्यक्तींकडून आलेले व पैसे देऊन कामे होत आहे व ते मंजुरी होऊन त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाल्याचे निदर्शनास आल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले.
घरकुल योजनांची कामे मागील सहा सात महिन्यांपासून पडून आहेत. घरकुल योजनेचे उद्दिष्ट एका गावाचे दुसऱ्या गावाला उद्दिष्ट दिले जाते. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासर्व बाबींची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे दखल घेत पंचायत समितीला कुलूप लावण्याचे पाऊल उचलले. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना कळवत एकनाथ डवले यांनाही पत्र देऊन त्यांनी गटविकास अधिकारी यांना सस्पेंड करण्यात यावी अशी मागणी केली आहे.