नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच ‘रेलवन’ या नावीन्यपूर्ण सुपर अॅपचे लोकार्पण केले आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सने विकसित केलेले हे अॅप आयआरसीटीसीशी संलग्न करण्यात आले आहे. लोकार्पण प्रंसगी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘रेलवन’ अॅपमुळे प्रवाशांचा वेळ, श्रम आणि डेटा सुरक्षित राहणार आहे. हे अॅप भारताच्या डिजिटल रेल्वे भविष्याच्या दृष्टीने टाकलेले मोठे पाऊल आहे.
‘रेलवन’ म्हणजे काय ?
‘रेलवन’ हे एक ऑल-इन-वन सुपर अॅप असून त्यामध्ये तिकीट बुकिंग, रेल्वेची लाइव्ह स्थिती, ई-कॅटरिंग, प्लॅटफॉर्म तिकीट आणि तक्रार नोंदणी यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. या अॅपची सध्या चाचणी सुरू असून लवकरच गुगल प्ले स्टोअर आणि अँपल अॅप स्टोअरवर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
---Advertisement---
वापरण्याचा सोपा आणि सुरक्षित अनुभव
प्रवाशांना अॅप वापरण्यासाठी मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पिन सेट करून लॉगिन करता येईल. या प्रणालीमुळे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित राहते आणि अॅप वापरणे अधिक सोपे आणि जलद होते.
आयआरसीटीसी अॅपवर परिणाम ?
रेल वन अॅप आयआरसीटीसी अॅपची जागा घेणार नाही. तर तो पर्यायी आणि अधिक सुविधा असलेला पर्याय म्हणून उपलब्ध राहील. आयआरसीटीसी अॅप पूर्वीप्रमाणे कार्यरत राहणार आहे
भविष्यातील विस्तार
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेल वन अॅप भविष्यात डिजिटल सुपर अँप बनवण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. यात लवकरच खालील सेवा जोडल्या जाण्याची शक्यता आहे : मेसेजिंग सुविधा, ई-कॉमर्स सेवा,पेमेंट गेटवे सोशल नेटवर्किंग फीचर्स.
कसे डाऊनलोड करावे?
गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोअर उघडा. त्यानंतर ‘रेल वन’ हे नाव शोधा आणि सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सकडून जारी अॅप निवडा. अॅप डाऊनलोड करा आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करा, एम-पिन तयार करा आणि लॉगिन करा.
अॅपमध्ये मिळणाऱ्या प्रमुख सेवा
तिकीट बुकिंग (सामान्य आणि तत्काळ)
रेल्वेची रिअल-टाइम स्थिती
जेवणाची ऑर्डर (ई-कॅटरिंग)
प्लॅटफॉर्म तिकिटाची ऑनलाइन खरेदी
तक्रार नोंदणी आणि पाठपुरावा
बुकिंग आणि रिफंडची माहिती