रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता पदयात्रा कार्यक्रमाचे आयोजन

---Advertisement---

 

भुसावळ : रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता पदयात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व माय भारत स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार मार्फत संपूर्ण देशभर सरदार १५० एकता पदयात्रा उपक्रम राबविला जात आहे, जो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमातून त्यांच्या भारत एकीकरणातील अद्वितीय कार्याचा गौरव करण्यात येत असून,एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत या ध्येयाशी ही पदयात्रा सुसंगत आहे.

या पदयात्रेसोबत विविध जिल्ह्यांमध्ये विकासात्मक उपक्रम राबविण्यात येतील, जसे की जलाशय स्वच्छता मोहिमा, सरदार उपवन’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, महिला कल्याण शिबिरे, योग व आरोग्य शिबिरे, तसेच ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमा. या सर्व उपक्रमांचा उद्देश नागरिकांना सहभागी करून घेणे, स्थानिक नवकल्पनांचा उत्सव साजरा करणे, आणि युवाशक्तीला राष्ट्रनिर्मितीकडे प्रवृत्त करणे हा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---