तुटवडा नसताना गॅस एजन्सीचालकांकडून नाहक त्रास, नागरिकांमध्ये प्रचंड रोष कारवाईची मागणी

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील गॅस वितरण व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मोहित गॅस एजन्सीच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, वेळेत सेवा न मिळणे आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील अनेक भागांतील ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी सकाळी लवकर एजन्सीच्या कार्यालयाबाहेर रांगा लावाव्या लागत असल्याचे समोर आले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रतीक्षा करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सिलेंडर उपलब्ध असतानाही वितरण प्रक्रियेत होणारा विलंब हा संतापाचा मुख्य मुद्दा ठरत आहे.

याशिवाय, एजन्सीतील काही कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी अयोग्य आणि उद्धट भाषेत संवाद साधला जात असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. ग्राहकांनी विचारलेल्या साध्या प्रश्नांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्तनामुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिकच वाढत असून, एजन्सी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे याबाबत तक्रारी दाखल केल्या असून, तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरण प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि ग्राहकाभिमुख पद्धतीने राबविण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, एजन्सीच्या कामकाजावर देखरेख ठेवून ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---