---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग, शेतकरी हवालदिल

---Advertisement---

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच आज जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामध्ये कांदा, केळी व मका पीकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल  झाला आहे.

जिल्ह्यातील काही भागात आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तसेच काही वेळात गारपीटीला सुरुवात झाली तब्बल वीस मिनिटे गारपीट झाली. यामुळे अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड,तरोडा,रुईखेडा,ढोरमाळ,निमखेडी खुर्द आदी भागात गारपीटीमुळे कांदा व मका पीकांचे खुप मोठे नुकसान झाल्याचे कळते. सुमारे अर्धा तासापर्यतच्या चाललेल्या या गारपीटीमुळे शेतकरी वर्ग भयभयीत झाला.

ऐन कापणीवर आलेल्या हजारो हेक्टरवरील केळीबागांचे प्रचंड नुकसान शेतकरी हवालदिल  झाला आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परीसरातील अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले. पुन्हा संध्याकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असून मेघगर्जना जोरदार सूरु आहे. यामुळे अवकाळीचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाकडुन तात्काळ पंचनामे करुन लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडुन होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment