जळगाव : मे महिन्यात ४८ अंशापर्यंत अति तापम नासाठी ओळखल्या जाणान्या जळगाव जिल्ह्यात या वर्षी बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत सप्ताहात सुमारे १० हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी (१६ मे) सायंकाळी झालेल्या वादळी व बेमोसमी पावसामुळे सुमारे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला असून नऊ पशुधन मृत्युमुखी पडले आहे.
जळगाव जिल्हा मे २०२५ मध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या बेमोसमी पावसामुळे चर्चेत आहे. या हवामान बदलामुळे जिल्ह्यातील १६ हजार ५४८ शेतकऱ्यांचे तब्बल १० हजार २६७.४४ हेक्टरवरील केळी, मका, ज्वारी, बाजरी आणि कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. मे महिन्यात शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत केली जाते. मात्र या वर्षी बेमोसमी पावसामुळे ही प्रक्रिया कोलमडली आहे.
तारीखनिहाय नुकसानीचा आढावा
५ मे चाळीसगाव व जामनेर तालुक्यात ११ गावे, २६२ शेतकरी, १०२.७० हेक्टरचे नुकसान. ६ मे चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा तालुक्यात ५८८ गावांतील १२ हजार २२८ शेतकरी, सात हजार २३५.०८ हेक्टरवर नुकसान. ७ मे मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर तालुक्यात १०१ गावांम धील तीन हजार ५६६ शेतकरी, दोन हजार ४७०.३६ हेक्टरचे नुकसान, ११ व १२ मे रावेर व चोपडा तालुक्यात नऊ गावांमधील ४९२ शेतकरी, ४५९.३० हेक्टर, असे सुमारे १० हजार २६७.४४ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
तर १६ मे चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पाचोरासह जळगाव जिल्ह्यात अनेक भागांत शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी तावली. खर्ची (ता. एरंडोल) येथे अंगावर बीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे चार गाींचा वीज पडून मृत्यू झाला. शुक्रवारी अमळनेर, जामनेर, भडगाव, बोदवड, पारोळा, कजगाव, बाळद, कढोली, विखरण आदी ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला.
खर्ची येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शरद रामा भिल (३५) या शेतमजुराचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. तसेच मुकुंदा दामू पाटील यांच्या बैलाचा वादळी वाऱ्यामुळे पत्रा उडून जखमी झाल्याने मृत्यू झाला. गालापूर रस्त्यालगत वीज पहून दोन बोकड दगावले असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
अमळनेर तालुक्यात शुक्रवारी वादळी पावसामुळे सखाराम महाराज यात्रेतील दुकानदारांची धावपळ उडाली. वीज पडून फापीर येथील चार बैलांचा मृत्यू झाता पाचोरा तालुक्यात शेवाळे पेये शेतकरी रामेश्वर यशवंत पाटील यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या तीन गार्गीवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. पारोळा तालुक्यातील हिरापूर येथे वीज पडून प्रकाश दशरथ पाटील यांच्या मालकीच्या गायीचा मृत्यू झाला. तर चाळीसगाव तालुक्यात दोन दुधाळ पशुधनाचा मृत्यू झाल्याने नऊ पशुधनाची हानी झाली आहे.