तळोदा : तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या रापापूर, राणीपूर, अलवान या गावांत गुरुवारी (३ एप्रिल) दुपारी तीन ते सायंकाळी पाचदरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीटसदृश पाऊस (Unseasonal rain) झाला. यामुळे परिसरातील हरभरा, गहू, मका, दादर पिकांचे मोठे नुकसान झाले. दुपारी तीनपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे काही भागांतील घरांवरील पत्रेही उडाली. काही ठिकाणी गारपीट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. गारपिटीसह वादळी अवकाळी पावसाचा फटका अलवान गावासह परिसराला बसला.
तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या राणीपूर परिसरातील अलवान ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या केलापानी, थेवापाणी या भागासह आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात गुरुवारी दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट सदृश पाऊस झाला आहे.तसेच धडगाव तालुक्यातील काकरदा, खामला, देवबारा, मांडवी येथे देखील बारीक झाला.

अवकाळी पाऊसामुळे परिसरातील हरभरा, गहू आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, दादर पिकाचेही नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजल्यापासून अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि आकाश ढगांनी भरून आले. जोरदार वारा असल्यामुळे काही भागातील घरांवरील पत्रे देखील उडाली आहेत.
तसेच, पावसामुळे काही ठिकाणी गारपीट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या गारपिटीचा आणि वादळी पावसाचा फटका अलवान गावासोबतच आजूबाजूच्या गावांनाही बसला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आंबा फळबागांचे मोठे नुकसान
सातपुड्याच्या पायथाशी वसलेले अलवान व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे असून काही दिवसात आंबे निघणार होते परंतु अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले आंब्याची झाडे या पाऊसामुळे झोडपले गेले असून शेतकऱ्यांचा हातातोंडांशी आलेला घास या अवकाळी पाऊसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.