इस्रायलमधील अस्थिर सरकारांची स्थिर धोरणे

– वसंत गणेश काणे

इस्रायलमध्ये पक्षांची बजबजपुरी आहे. नित्य नवनवीन पक्ष जन्माला येत असतात तसेच काही अस्तंगतही होत असतात. असे का होत असेल? तर इस्रायलमधील निवडणूकविषयक नियमांमुळे असे होत असते. Israel इस्रायलमध्ये पक्षच निवडणूक लढवू शकतात. एकटी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. म्हणून एखाद्याला निवडणूक लढविण्याची इच्छा झाली तर तो अगोदर नोंदणीसाठी आवश्यक असलेले किमान सदस्य गोळा करतो, पक्ष स्थापन करतो आणि त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतो. Israel त्या व्यक्तीची लढण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तो विजयी झाला तर ठीक आहे.

विजयश्रीने माळ घातली नाही आणि तो निराश होऊन स्वस्थ बसला तर तो पक्ष संपतो संपल्यातच जमा होतो. Israel त्यामुळे इस्रायलमध्ये डझनावारी पक्ष जसे नित्य निर्माण होत असतात, तसेच ते अंतर्धानही पावत असतात. असे असले तरी निदान आठ-दहा पक्ष इस्रायलमध्ये सुरुवातीपासून टिकून आहेत. ते आघाड्या करून निवडणूक लढवतात किंवा एकमेकांत विलीन तरी होऊन नवीन पक्ष तयार करून निवडणूक लढवतात. Israel यांचा हिशोब ठेवताना अभ्यासकांच्या मेंदूला मुंग्या न आल्या तरच नवल! या पक्षांचे तसेच त्यांच्या आघाड्यांचे उजवे, डावे, अतिउजवे, अतिडावे, मध्यममार्गी, धार्मिक उदारतावादी किंवा कडवे असे विविध प्रकार आहेत.

याशिवाय असे की, इस्रायलमध्ये ज्यू ८० टक्के तर अरब २० टक्के आहेत. त्यामुळे ज्यूंचे पक्ष, अरबांचे पक्ष आणि आता या दोघांमधले मवाळ एकत्र येऊन क्वचित तयार होणारे संयुक्त पक्षही आहेत. शिवाय असेही की, सर्व ज्यूंचा धर्म जरी एकच असला, तरी त्यांच्यात पंथही काही कमी नाहीत. Israel त्यामुळे पंथाभिमान जोपासणारे पक्षही आहेत. यांचे साहजिकच आपापसांत फारसे सख्य नसते तसेच इस्रायलमध्ये आलेले ज्यू अनेक देशातून आपली मायभूमी पुन्हा एकदा वसवण्याच्या एकाच तीव्र इच्छेने आलेले असले, तरी त्यांच्या अनेक पिढ्या ज्या देशात गेलेल्या असतात त्या देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचा त्यांच्यावर अपरिहार्यपणे परिणाम झालेला असतो. जसे की, रशियासारख्या साम्यवादी देशातून आलेल्या ज्यूंवर साम्यवादाचा परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? Israel त्याचप्रमाणे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली यासारख्या लोकशाहीवादी देशातून आलेले ज्यू साम्यवादाच्या परिणामांपासून मुक्त आणि साम्यवाद्यांशी फटकून वागणारे असतात, हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

ज्यूंमध्येही कट्टर आणि मवाळ आहेतच, असणारच. Israel एक मात्र मानले पाहिजे की, जेव्हा इस्रायलच्या अस्तित्वाचा किंवा Israel अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र हे सगळे एकदम एक होतात. या मुद्याबाबत तसेच आर्थिक धोरणांबाबत मात्र त्यांच्यात फारसे मतभेद नसतात. त्यामुळे इस्रायलमधल्या सरकारांमध्ये अस्थिरता असली, तरी धोरणात मात्र एक किमान सातत्य आढळून येते आणि आर्थिक सुबत्तेलाही बाधा पोहोचत नाही, हे विशेष!Israel पण आता हळूहळू जहाल मवाळ असे नवीन पोटभेद निर्माण व्हायला सुरुवात झालेली आढळते. कालमानानुसार ते तसे होणारच.
इस्रायलमधील पक्ष आणि १२० जागांचा हिशोब

१. लिकुड पार्टी – नॅशनल लिबरल मूव्हमेंट किंवा लिकुड म्हणजे घट्टपणे एकत्र असलेला (कन्सॉलिडेटेड) पक्ष, १९७३ मध्ये अनेक छोटे पक्ष एकत्र येऊन तयार झालेला हा पक्ष मध्यममार्गी पण उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. Israel बेंजामिन नेतान्याहू हे स्वतंत्र इस्रायलमध्ये जन्मलेले नेते आहेत. महिलांचे बाबतीत सैल वर्तन असलेले बेंजामिन नेतान्याहू कडवे ज्यू आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत या पक्षाला २३.४१ टक्के मते व ३२ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा २ ने जास्त आहेत.

२. ब्ल्यू अँड व्हाईट पार्टी – ही मध्यममार्गी उदारमतवादी आघाडी आहे. Israel २०१९ मध्ये रेझिलियन्स पार्टी, येश एटिड पार्टी आणि टेलेम पार्टी यांनी ही आघाडी उभारली आहे. बेंजामिन नेतान्याहू यांचा पराभव करायचाच, असा दृढनिश्चय करून हे पक्ष एकत्र आले होते. मात्र, नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत ही आघाडी अस्तित्वात नव्हती; ती दुभंगली होती. Israel त्यामुळे जागांचा हिशोब नाही. या आघाडीतील येश पार्टी हा उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि मध्यमवर्गीयांचा पक्ष आहे. येर लेपिड यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत १७.७८ टक्के मते व २४ जागा मिळाल्या आहेत. Israel या विसर्जित सभागृहातील या पक्षाच्या जागांपेक्षा ७ ने जास्त आहेत.

३. शास पार्टी – शास हा स्पेनमधून परांगदा झालेला अति सनातनी हेराडी ज्यू पंथ आहे. हे फक्त हलाखा या ज्यू कायद्याशिवाय आणि परंपरेशिवाय आणखी इतर कोणतेही आधुनिक नीतिनियम मानायला तयार नसतात. Israel एवढेच नव्हे, तर हे इतरांचा तिरस्कार करणारेही आहेत. खरे ज्यू आपणच, असे मानणारे हे ज्यू आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यात शास पार्टी असतेच, असे संख्याबळ या पक्षाचे पार्लमेंटमध्ये असते. Israel आर्ये डेरी यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत ८.२४ टक्के मते व ११ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा २ ने जास्त आहेत.

४. युटीजे पार्टी – या पक्षाचे पूर्ण नाव युनायटेड टोरा ज्युडाइझम असे आहे. ही खरे तर दोन हेराडी पंथीय पक्षांची आघाडी आहे. यिझाक गोल्डनॉफ यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत ५.८८ टक्के मते व ७ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांइतक्याच आहेत.

५. हाडाश-ताल पार्टी – ही हाडाश पक्ष आणि ताल पक्ष आणि अन्य डावे पक्ष यांची आघाडी आहे. हिचे स्वरूप एखाद्या तंबूसारखे आहे. Israel म्हणजे असे की, डावीकडे झुकलेल्या सर्व पाट्र्या या आघाडीत असतात. आयमन ओडे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत ३.७५ टक्के मते व ५ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांइतक्याच आहेत.

६. इस्रायली लेबर पार्टी ऊर्फ हावोडा पार्टी – हा पक्ष सामाजिक लोकशाहीचा आणि ज्यू राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. कामगार चळवळ उभारणारे सर्व नेते या पक्षाशी संबंध ठेवून असतात. धर्मातीत आणि राष्ट्रवादी भूमिका घेणारा हा पक्ष मध्यममार्गी पण काहीसा उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. Israel मेराव मिचेली यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत ३.६९ टक्के मते व ४ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा ३ ने कमी आहेत.

७. रिलिजिअस झिओनिस्ट पार्टी – पॅलेस्टाईन किंवा सीरिया यांना तसूभरही भूमी देण्यास या पक्षाचा विरोध आहे. यातील काही तर सर्व वेस्ट बँक ताब्यात घ्या, असे म्हणणारे आहेत. Israel पण बहुतेकांची भूमिका वेस्ट बँकेचा ६३ टक्के भाग ताब्यात घ्यावा अशी आहे. या पक्षाचा समqलगी विवाहांना धार्मिक कारणास्तव विरोध आहे. स्थलांतरित अरबांची हकालपट्टी, सरकार नियंत्रित न्यायपालिका यावर या पक्षाचा भर आहे. या पक्षाच्या भूमिका ज्यू वर्चस्ववाद आणि अरबविरोध यावर आधारित असतात. बेझानेल स्मॉटरिच यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत १०.८३ टक्के मते व १४ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा ८ ने जास्त आहेत.

८. नॅशनल युनिटी पार्टी – प्रत्यक्षात ही एक आघाडी आहे. बेनी गँट्ज यांची ब्ल्यू व्हाईट पार्टी आणि गिडिऑन सॉर यांची न्यू होप पार्टी यांच्या या आघाडीवर माजी चीफ ऑफ स्टाफ, गादी इझनकोट यांचा वरदहस्त आहे. Israel बेनी गँट्ज यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीत ९.०८ टक्के मते व १२ जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा २ ने कमी आहेत.