उत्तर भारतीय ब्राह्मण संघातर्फे उपनयन संस्कार समारोह : २२ बटुक सहभागी

जळगाव :  शहरात प्रथमच उत्तर भारतीय ब्राह्मण समाजाचा “सामुहीक उपनयन संस्कार (मुंज) चा कार्यक्रम उत्तर भारतीय ब्राह्मण संघाचे अध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात २२ बटुक यांनी सहभाग घेतला.

उत्तर भारतीय ब्राह्मण संघ,  या संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमीत्त तसेच आगामी परशुराम जन्मोत्सवानिमीत्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.  पांझरापोळ संस्थान, नेरी नाका येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बुरहानपुर, खामगांव, भडगाव, तळई तसेच जळगाव शहरातून असे एकुण २२ बटुक या कार्यक्रमात सहभागी झालेले होते. या सोहळयासाठी २२ बटुकांसाठी २२ माणिकखांब उभारण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व बटुकांना विधी परंपरेनुसार पुजन करुन त्यांची मिरवणुक काढण्यात आली व त्यानंतर सन्मानपत्र देवून संस्थेकडुन त्यांचा गौरव करण्यात आला. या आधी असा सामुहीक कार्यक्रम फक्त नाशिक, खंडवा, इंदोर अशा शहरातच होत असे परंतु या वर्षापासुन उत्तर भारतीय ब्राह्मण संघाकडुन ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामुळे समाजातील सर्व बांधवामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. यासाठी नाशिक कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष  निरज तिवारी तसेच उत्तर भारतीय ब्राह्मण संघाचे जेष्ठ सदस्य लेखराज उपाध्याय, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे माजी संस्थापक अध्यक्ष  श्रीकांत खटोड, अध्यक्ष  नितीन पारगांवकर हे  उपस्थित होते. या कार्यक्रमात समाजातील जेष्ठ सदस्यांचा सन्मान व सत्कार देखील संस्थेकडुन करण्यात आला.  यशस्वीतेसाठी उत्तर भारतीय ब्राह्मण संघ, जळगावचे सचिव गोविंद तिवारी, सह-सचिव  दिनेश बाजपेयी, सदस्य  राहुल अवस्थी, रोहीत तिवारी, हर्षल तिवारी, तुषार मिश्रा, मिलीद तिवारी यांनी प्रयत्न केले.