अर्बन नक्षल्यांबद्दलच्या प्रेमाचे न उमजणारे काेडे

#image_title

urban naxals-Congress राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लाेकसभेत झालेल्या दाेन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत कुणाचेही नाव न घेता गांधी घराणे, काँग्रेस पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना चांगलेच आडव्या हाताने घेतले. संविधानाचे नाव घ्यायचे, हातात संविधानाची प्रत बाळगायची आणि घटनाविराेधी कृत्ये करायची, हे धाेरणच या साऱ्यांनी गेल्या काही काळापासून भारतीय राजकारणात राबवले आहे. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे शहरी नक्षलवाद्यांना संविधान समजू शकत नाही, ही बाब यापूर्वीही अनेकवार अधाेरेखित झाली आहे. देशातील अनेक राजकारण्यांवर या विचारांचे गारुड रुंजी घालत आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीत रस्त्यावर उतरून केलेले आंदाेलन देशाची जनता आजही विसरलेली नाही. अर्बन नक्षल्यांच्या पाठिंब्याने दिल्लीत झालेल्या शाहीनबाग आंदाेलनाला काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची फूस हाेती हे लपून राहिलेले नाही. किसान आंदाेलनामागील शक्तीही उजागर झाल्या, ज्यांची जवळीक अर्बन नक्षलवाद्यांशी हाेती.

Nari Shakti Half page

देशात ठिकठिकाणी हाेणारी आंदाेलने आणि त्यामागील शक्ती ज्या पूर्वी ओळखणे दुरापास्त हाेते, ते माेदींच्या कार्यकाळापासून सहजसाध्य झाले आहे. या साऱ्या शक्तींची बाेलण्याची भाषा एक आणि कृती मात्र देशविराेधी असते. म्हणूनच पंतप्रधानांना म्हणावे लागले की, भारतीय संघराज्याविरुद्ध लढायची घाेषणा करणारे संविधानातील भावना समजू शकत नाहीत. देशाची एकता, अखंडता काय हेदेखील समजू शकत नाही. संविधानाचे नाव घ्यायचे, गरिबांबद्दल कणव असल्याचे दाखवायचे आणि शिशमहल उभारायचा, दारू घाेटाळा करायचा, मंत्र्यांच्या घाेटाळ्यांवर पांघरूण घालायचे, सातत्याने केंद्र सरकारसाेबत पंगा घेण्याचे केजरीवालांचे राजकारण आपण बघितले आहे. आता तर विराेधी पक्षनेते राहुल गांधी हेदेखील त्याच मार्गाने निघाले आहेत. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात काेण अर्बन नक्षल्यांच्या जास्त जवळ आहे, हे दाखवून देणारी कृती करण्याची स्पर्धाच लागली आहे. काँग्रेसने गतकाळात आणि वेळाेवेळी गरिबी हटावचा नारा दिला पण कधीच देशातील गरिबी हटविली नाही. सातत्याने भांडवलशाही आणि घराणेशाहीचे राजकारण केले.

सत्ता शाबूत ठेवण्यासाठी गावगुंड, अर्बन नक्षल, माओवादी, मार्केट फोर्सेस, सांस्कृतिक मार्क्सवाद, डीप फेक, बाह्य शक्ती, जिहाद्यांची मदत घेतली. आता तर काँग्रेसचे युवराज डाव्या विचारसरणीच्या काेंडाळ्यामध्ये पुरते फसलेले दिसत आहेत. आम्ही तर म्हणताे राहुल गांधींच्या रूपात सात दशकांनंतर हिंसक आणि देशद्राेही नक्षलवादी चळवळीला नेतृत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी इंडियन स्टेटविरुद्ध पुकारलेल्या ‘एल्गार’मुळे काँग्रेसच्या अत्यंत घातक आणि अराष्ट्रीय मानसिकतेचे दर्शन घडत आहे. आपण असेही म्हणून शकताे की, त्यांच्या वेळाेवेळीच्या हिंदूविराेधी, कम्युनिस्टधार्जिण्या कृतींमुळे देशातून नाहीशा हाेत चाललेल्या नक्षल चळवळीला जणू काही अघाेषित नेतृत्वच झाले आहे. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आदी इंडिया आघाडीतील नेते मंडळींनी ज्या शहरी नक्षलवाद्यांना अभय दिलेले आहे, त्यांनी देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात नुसता हैदाेस घातला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांचा राष्ट्रविराेधी कृत्यांमध्ये असलेला सहभाग लपून राहिलेला नाही.

जी जी म्हणून राष्ट्रीय प्रतीके आहेत, ती नाकारण्याचा धंदाच यांनी आरंभला आहे. एकीकडे महाराष्ट्रासह देशभरात नक्षल चळवळ नेस्तनाबूत हाेत असताना शहरी नक्षलवादी आणि त्यांच्यार्फात नक्षलवाद्यांना मिळणारे सैद्धांतिक पाठबळ कसे काय खपवून घेतले जाऊ शकते? आज जगभरातील हिंदूंना आपल्या हिंदू असण्याबद्दल गाैरव वाटत असताना, ही मंडळी साèया अहिंदू कृत्यांची री ओढत आहेत. वर्षानुवर्षे शहरी नक्षलवाद हा आपल्यामध्ये उच्चभ्रू मुखवटा घेऊन उजळ माथ्याने वावरत आहे. आजपर्यंत व्यवस्थेवर काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या लाेकांचे वर्चस्व असल्याने त्यांच्याद्वारे पाेषित शहरी नक्षलवाद सर्व व्यवस्थांमध्ये खाेलवर रुजला. कधी भांडवलदारांना विराेध करणे, कधी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून विकास प्रकल्पांना विराेध करणे, कधी वनवासींच्या अस्मितेचा मुद्दा मांडून ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांना विराेध करणे, कधी शेतकऱ्यांच्या गरिबीचा मुद्दा उपस्थित करून रासायनिक खते आणि औषधांना विराेध करणे, अशा एक ना अनेक मुद्यांचे भांडवल करून, जनतेत कायम अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यांना सरकारविरुद्ध पेटवायचे, हा शहरी नक्षलवाद्यांच्या कार्यप्रणालीचा भाग झालेला आहे.

भारतीय शिक्षणव्यवस्था पाश्चिमात्यांच्या मानसिकतेच्या चाैकटीत अडकवून ठेवण्याचे काम शहरी नक्षलवाद्यांनी बेमालूमपणे केले. आज आपली तरुण पिढी जाे इतिहास शिकते आहे, ताे डाव्या विचारसरणीने कलुषित केलेला आहे. याचा परिणाम असा झाला की येथील विद्यार्थ्यांना आपल्याच इतिहासाचा, संस्कृतीचा, धर्माचा, आपल्या तत्त्वज्ञानाचा, आपल्या साध्या जावनशैलीचा विसर पडलेला दिसताेय. भारताची परंपरा सर्व विचारांचे स्वागत करणारी असली तरी यात स्वतःच्या अस्तित्वाचे व मूळ भारतीय विचारांचे विस्मरण व्हावे, असा निश्चितच याचा अर्थ हाेत नाही. माओवाद्यांनी कायम भारताच्या अस्तित्वावर घाला घातला व यासाठी त्यांनी परिणामकारक पद्धतीने शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारतीयांना स्व:चे विस्मरण करायला भाग पाडले. भारतीयत्वाचे अर्थात् राष्ट्रीयत्वाचे अर्थात् हिंदुत्वाचे विस्मरण झाल्याने आपल्याच प्रथा, परंपरांबद्दल आक्षेप घेणारे अभारतीय निर्माण झाले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी केलेले वक्तव्य याठिकाणी उपस्थित केले जायला हवे.

खडगे महाशय म्हणतात, गंगेत डुबकी लावल्याने देशातील गरिबी नाहीशी हाेईल का? त्यांचे म्हणणे याच विचारसरणीचे समर्थन करणारे आहे. ते म्हणतात त्या प्रमाणे गंगेत डुबकी मारल्याने गरिबी नाहीशी हाेणार नसली तर त्या मिळालेल्या ऊर्जेत लक्षावधी लाेकांची बेराेजगारी दूर करण्याची निर्माण हाेणारी धर्मशक्ती कशी काय दुर्लक्षित केली जाऊ शकते ?
एकीकडे शासनाला धाेरणलकवा झाल्याचा आराेप करायचा आणि एखादी कृती केली किंवा निर्णय घेतला तर त्याविरुद्ध हाे हल्ला करायचा, संपाची हाळी द्यायची, आंदाेलनाचा इशारा द्यायचा, यातसुद्धा शहरी नक्षलवाद्यांचा हातखंडा आहे. कुठल्याही शासकीय निर्णयाविरुद्ध कधी आदिवासींना उकसवायचे, कधी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करायचा, कधी महिलांच्या गळचेपीचा मुद्दा लावून धरायचा आणि कधी मागासवर्गीय, अनुसूचित जाती, धार्मिक अल्पसंख्यक आदींचा मुद्दा आळवायचा हे त्यांना वर्षानुवर्षांच्या अनुभवाने चांगलेच ठावूक झालेले आहे.

मुळात 100 वर्षांचा इसिहास असलेल्या काँग्रेस पक्षाने आणि या पक्षाच्या नेतृत्वाने शहरी नक्षलवाद्यांसाेबत उभेच का म्हणून राहावे, हा खरा प्रश्न आहे. शहरी नक्षलवाद आता अखेरचे आचके देऊ लागला आहे. त्याच्या पाठिंब्याने सुरू झालेली नक्षलवादी चळवळ आता देशातील उण्यापुऱ्या 8-10 जिल्ह्यांपुरती उरलेली आहे. कर्नाटक राज्यातील अखेरच्या नक्षलवाद्याने शरणागती पत्करल्याने हे राज्य नक्षलमुक्त म्हणून घाेषित करण्यात आले आहे. नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या गडचिराेली जिल्ह्यातही नक्षलवादाला अखेरची घरघर लागली आहे. या परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडून त्यांना मिळणारी रसद अजूनही का थांबलेली नाही, हा शाेधाचा विषय आहे.

राहुल गांधी यांच्या विधानांकडे केवळ ‘बालिश’ आणि ‘अज्ञानी’ या भूमिकेतून बघून चालणार नाही. लाेकसभेचे विराेधी पक्षनेतेपद भूषविणारा हा आधुनिक चारू मुझुमदार देशासमाेरील अत्यंत गंभीर संकट म्हणून उभा ठाकला आहे, ही बाब ध्यानात घेतली जायला हवी. चारू मुझुमदार हे नक्षल चळवळीचे जनक हाेते. त्यांच्याच पुढाकारातून नक्षल चळवळ सुरू झाली. प्रारंभी केवळ सरकारी यंत्रणा आणि भांडवलदारांविराेधात उभ्या ठाकलेल्या नक्षलवादाला कधी आणि केव्हा आपल्याच बांधवांच्या रक्ताची चटक लागली हे कळलेच नाही. जेव्हा आपल्याच बांधवांच्या रक्ताला चटावलेल्या नक्षल चळवळीचा बुरखा फाटायला लागला तसतशी या चळवळीबद्दलची वनवासींची सहानुभूतीही आटू लागली. त्यांच्याबद्दलचे आटलेले प्रेम राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष पुन्हा का मिळवून देऊ पाहात आहे, हे न उमजणारे काेडे आहे?