---Advertisement---

बापरे! जळगावात थेट तहसीलदारांच्या बनावट सहीचा वापर, जन्म दाखल्यात बांगलादेश कनेक्शन?

---Advertisement---

जळगाव : तहसीलदार यांची बनावट सही करीत संशयितांनी मनपातून जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार यांच्या तक्रारीनुसार ४८ जणांवर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (४ एप्रिल) गुन्हा दाखल झाला. या बनावट प्रमाणपत्रांचे बांगलादेश कनेक्शन आहे किंवा काय ? याचा तपास या गुन्ह्यात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात हा संशयास्पद प्रकार ३ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २५ या कालावधीत घडला. नायब तहसीलदार (निवडणूक) नवीनचंद्र भावसार (वय ५३, रा. कोल्हेनगर) यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी शुक्रवारी (४ एप्रिल) शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चांद मोहम्मद प्यारजी, असलमखान सादीकखान, अशफाक बुढान बागवान, रज्जाबी अब्दुलगनी, बुशराखान मोहम्मद इस्लाउद्दीन, मोहसीन चांद मोहम्मद व यादीतील अन्य ४२ यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संशयितांनी तसेच त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून जन्म-मृत्यू दाखला देण्यासंदर्भाच्या आदेशावर तहसीलदार शीतल राजपुत यांची बनावट सही वापरून प्रमाणपत्र प्राप्त करून फसवणूक केली, असे या तक्रारीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे तपास करीत आहेत.

पारदर्शकतेचा अभाव

मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातून काही ठरावीक वर्षांचे दप्तर गहाळ झाले आहे. त्या वर्षाचे दाखले मिळविण्यासाठी संबंधितांना न्यायालय किंवा तहसील कार्यालय यांच्याकडून आदेश आणावा लागतो. अर्जदाराने आणलेल्या आदेशाची पडताळणी करण्याची जबाबदारी या विभागाची आहे. मग ही पडताळणी केली असल्यास इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस नावांची यादी समोर आली कशी? मनपा जन्म-मृत्यू विभागात पारदर्शकतेचा अभाव यातून दिसून आला. यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment