---Advertisement---

Crime News : लग्नाच्या बातमीने प्रियकर बनला खुनी, रस्त्याच्या मधोमध प्रेयसीवर झाडली गोळी

---Advertisement---

Crime News : प्रेयसीच्या लग्नाची माहिती मिळताच संतापलेल्या प्रियकराने थेट प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी प्रियकराने पिस्तूलसह पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रानुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही घटना घडली आहे. बिजनौरच्या कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करोंडा चौधर गावात एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची गोळ्या घालून हत्या केली. आरोपी प्रियकर शिवन त्यागी हा त्याच गावातील निशूसोबत कॉलेजमध्ये शिकत होता. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, निशूच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडे निश्चित केले होते. निशूच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती.

दरम्यान, रविवारी सकाळी निशु तिच्या वडिलांसह बहिणीसोबत खरेदीला जात होती. दरम्यान, प्रेयसीच्या लग्नावर संतापलेला प्रियकर शिवन याने गावाजवळील बधापूरमध्ये निशूवर मागून गोळी झाडली. घटनेनंतर निशूला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. प्रियकर शिवन त्यागी हा फिल्मी शैलीत पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून निशचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी संजीव कुमार बाजपेयी आणि सीओ नगीना घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. तसेच, आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment