जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात येणार ; अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने रिक्त पदे भरण्यात येत आहेत.

यात सभागृह व्यवस्थापक-२, वसतिगृह अधिक्षक-१, वसतिगृह अधिक्षीका-१, पहारेकरी कम एमटीएस -४, सफाई कर्मचारी -२ व स्यंवपाकी-४ या पदांचा समावेश आहे. ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे.  तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह ५ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी ०२५७- २२४१४१४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.