Valentine Day’ : मनपाच्या पर्यावरण विभागाचा जळगावकरांसाठी असाही ‌‘व्हॅलेटाईन डे’

Valentine Day’ : आपल्या प्रियजनांना अमूल्य व चिरकालापर्यंत टिकेल अशी भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यातही व्हॅलेंटाईन डे ला तर ही इच्छा अधिक प्रबळ होत असते. हाच धागा पकडून महापालिकेच्या पर्यावरण विभागाने जळगाकरांसाठी वृक्ष्ारूपी व्हॅलेटाईन डे साजरा करण्याची योजना 14 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे.

 

वाढदिवस असो वा स्मृती दिवस असो या दिवशी आपल्या प्रियजनांना अमूल्य अशी भेट देण्याची इच्छा असते. भेटवस्तू पैशाने विकत घेवून दिली तर ती काही दिवस टिकते. नंतर ती खराब होत असते. त्यामुळे दिलेली भेटवस्तू चिरकालापर्यंत स्मरणात राहत नाही. यावर उत्तम पर्याय महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे.

 

अशी आहे योजना

वाढदिवस असेल किंवा स्मृती दिवस असेल त्यानिमित्ताने ज्यांच्याजवळ आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल त्याने त्या व्यक्तीच्या आवडीची रोपे विकत घेवून ती महापालिकेच्या पर्यावरण विभागातील ट्री बँकेत जमा करावी. ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी या ट्री बँकेतून ही झाडे घेवून जात त्याच्या परिसरात लावून त्याचे संगोपन करावे. याची पर्यावरण विभाग नोंद घेईल.

 

कुंडीतील रोपेही करता येतील जमा

अनेकांच्या घरात कुंडीत झाडे मोठी होत असतात. ती लावण्यासाठी पुरेशी जागा नसते. अशी मोठी झालेली रोपेही या ट्री बँकेत जमा करता येतील. ही रोपे महापालिकेच्या खुल्या जागा, उद्यानात लावता येतील. या सर्व बाबींची पर्यावरण विभाग नोंद ठेवणार आहे. यामुळे आपल्या प्रियजणांच्या नावाने ही रोपे जगवली जातील. ही रोपे अनेक वर्ष जगतील ती तुमच्या प्रियजनांच्या नावाने आणि तुमचे त्याच्यावरील प्रेमाचा आदरही व्यक्त होईल. यातूनच महानगरपालिका क्षेत्रात हरित क्षेत्र वाढीस आपला हातभारही लागेल.

 

कोठे कराल संपर्क

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या ट्री बँकेत रोपे देण्यासाठी किंवा ती रोपे लावण्यासाठी इच्छूकांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत 9 व्या मजल्यावर असलेल्या पर्यावरण विभागाशी संपर्क करावा.