मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतील सहा लोकांनी त्यांचे अपहरण केले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळला. हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे.
वाल्मीक कराडच्या शोधासाठी CID कडून मोठा प्रयत्न सुरु आहे. आज चार विशेष पथकं कराडच्या शोधात तपास करत आहेत. पुण्यातून दोन पथकं पहाटेच रवाना झाली, तर एक पथक सकाळी सुद्धा शोधासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच, कराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत. घटनास्थळी अधिक तपास सुरु आहे, आणि सीआयडीने कराडला गाठण्यासाठी विविध ठिकाणी कारवाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज सकाळी ११ वाजता स्वतःला शरण देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. मात्र, आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेरील हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलीसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
महतवाचे मुद्दे
वाल्मिक कराडला बीडमध्येही आणलं जाण्याची शकता, २४ तासात कोर्टात हजर करावे लागणार
जर पुण्यातच ठेवले, तर व्हिडिओ कन्फर्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात येईल…
कायदा व सुव्यवस्था आणि त्याचे आरोग्य- उपचार यासाठी पुण्यातच ठेवले जाऊ शकते.