---Advertisement---

वाल्मीक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ CID चे आरोपपत्र दाखल

by team
---Advertisement---

Santosh Deshmukh murder case: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल करुन यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. आरोपी दोन क्रमांक वर विष्णू चाटे याच नाव आहे. ५ गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाले. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचा आरोप पत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचा आरोप पत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड याचा उल्लेख आहे. आरोप पत्रामध्ये आरोपी नंबर दोन मध्ये विष्णू चाटे याचा उल्लेख आहे. त्यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली. त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचे देखील पुढे आले आहे. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांच्याकडे वाल्मीक कराड विष्णू चाटेच्या मोबाईल वरून फोन गेला आणि त्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली. २९ नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती.

६ डिसेंबर रोजी देशमुखांच्या गावामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळेंशी आवादा पवनचक्की प्रकल्पावर वाद घडला. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे आहे.

१) प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे. एकूण आरोपींत वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे.

२) कराडने फोनवरून मागितली खंडणी
आरोपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे २९ नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता.

३) पाच साक्षीदारांची साक्ष
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराडविरोधात सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे.

४) कराडने सुदर्शन घुले याला सांगितलं, कुणालाही सोडणार नाही
सात तारखेला सुदर्शन घुले याने वाल्मिक कराड यास कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतर घुले याने अवादा या कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली, असेही आरोपपत्रात नमूद आहे.

५) संतोष देशमुख यांना कायमचा धडा शिकवा, कराडचा संदेश
यानंतर आठ तारखेला एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment