Santosh Deshmukh murder case : वाल्मिक कराड CID ला शरण, संतोष देशमुख हत्याप्रकरणी दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीकडे शरण आला आहे. वाल्मीक कराडचा शोध गेल्या काही दिवसांपासून घेतला जात होता. त्याच्या शोधासाठी CID कडून मोठा प्रयत्न सुरु होते . अखेर वाल्मिक कराडने आज आत्मसमर्पण केले आहे.

वाल्मिक कराड याने आज पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये शरणागती पत्करली आहे. सीआयडी गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी CID कडून मोठा प्रयत्न सुरु होते आहे. त्यासाठी आज चार विशेष पथकं रवाना करण्यात आली होती. पण अखेर वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले आहे.

सीआयडीकडे आत्मसमर्पण केल्यानंतर आता सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे त्याची चौकशी करत आहेत. वाल्मिक कराडबरोबर परळीमधील दोन नगरसेवक सुद्धा उपस्थितीत आहेत. वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडी ऑफिस परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे तो हत्या प्रकरणी नाही, खंडणी प्रकरणी शरण आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यापूर्वी त्याने संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ प्रसिद्ध करत त्याने यासंदर्भात भाष्य केलं आहे.

काय म्हणाला वाल्मिक कराड ? 

“मला अटकपूर्व जामीनचा अधिकार असताना मी पुण्यात सीआयडीकडे शरण येतो आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. केवळ राजकीय हेतून याप्रकरणात माझं नाव घेतलं जात आहे. जर या प्रकरणात मी दोषी आढळलो तर कायद्याने मला जी शिक्षा होईल, ती भोगायला तयार आहे”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.