मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघां पक्षांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी रविवारी जाहीर केलेली असतांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत १६ जणांच्या नावाचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीने शनिवार, १९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत १६ उमेदवारांचे नावे आहेत. यात शहादा अलीबाबा रशिद तडवी
साक्री भिमसिंग बटन भिल, तुमसर भगवान भोडे, अर्जुनी मोरगाव दिनेश रामरतन पंचभाई, हदगाव दिलीप राठोड, भोकर रमेश राठोड, कळमनुरी दिलीप तातेराव मस्के,
सिल्लोड मनोहर जगताप, कन्नड अय्याज मकबुल शाह, छत्रपती संभाजीनगर पश्चिम अंजन लक्ष्मण साळवे, पैठण अरुण सोनाजी घोडके, महाड आरीफ अब्दुल्ला खान देशमुख, गेवराई
प्रियांका शिवप्रसाद खेडकर, आष्टी वेदांत सुभाष भादवे, कोरेगाव चंद्रकांत जानू कांबळे, कराड दक्षिण संजय कोंडीबा गाडे या उमेदवारांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत ११ उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत १० उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत ३० उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे वंचितकडून यापूर्वी ५१ उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या १६ उमेदवारानंतर वंचितकडून एकूण ६७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
शहादा मतदारसंघासाठीअलीबाबा रशिद तडवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते तडवी समाजाचे असल्याचं प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. साक्री मतदारसंघातून भिल्ल समाजाचे भीमसिंग बटन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून बौद्ध समाजाचे अंजन लक्ष्मण साळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कळमुनीर मतदारसंघातून धनगर समाजाचे दिलीप तातेराव मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.