पुणे : वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरु होणार आहे.
पुणे शहरातून 2 नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होत आहे. नव्या रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पुणे-बडोदा आणि पुणे – सिकंदराबाद या नव्या 2 वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. येत्या 12 मार्च रोजी पुण्यासह देशाला नव्या 10 वंदे भारत रेल्वे एक्स्प्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.