Vande Bharat Express : देशात वेगवान प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली ‘वंदे भारत ट्रेन’ लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. अमरावती ते मुंबई आणि अमरावती ते पुणे या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही हिरवा कंदील दिला आहे.
या प्रस्तावानुसार जळगाव आणि भुसावळ मार्गावरून प्रवाशांना अवघ्या ५ ते ७ तासांत मुंबई आणि पुणे याठिकाणी पोहोचता येणार आहे. भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर या गाड्यांचा थांबा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जळगावकरांचा लांबचा प्रवास अबाधित आणि आरामदायक होणार आहे.
प्रस्तावित वेळापत्रक
अमरावती ते मुंबई
थांबे: अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक
अमरावतीहून गाडी सुटण्याची वेळ: ०३:४०
मुंबईला गाडी पोहोचण्याची वेळ: ११:१०
गाडी परतण्याची वेळ: १५:५५
गाडी पोहोचण्याची वेळ: २३:२५
अमरावती ते पुणे
थांबे: अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड
अमरावतीहून गाडी सुटण्याची वेळ: ०४:२०
पुण्याला गाडी पोहोचण्याची वेळ: १२:२५
गाडी परतण्याची वेळ: १५:४०
गाडी पोहोचण्याची वेळ: २३:४५