---Advertisement---
भुसावळ : वंदे भारत गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेने प्रायोगिक तत्वावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे-हुबळी पुणे वंदे भारत या गाड्यांना अनुक्रमे दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.
२२२२५/२२२२६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा दौंड येथे राहील. गाडी क्रमांक २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर २०२५ पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे २०.१३ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर २०२५ पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे ०८.०८ वाजता पोहोचेल.
२०६७०/२०६६९ पुणे-हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा किर्लोस्करवाडी येथे राहील. गाडी क्रमांक २०६७० पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर २०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी किर्लो स्करवाडी येथे १७.४३ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक २०६६९ हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर २०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी किर्लोस्करवाडी येथे ०९.३८ वाजता पोहोचेल. दौंड आणि किलर्लोस्करवाडी येथील प्रवासी आता त्यांच्या स्थानकांवरूनच वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढू किंवा उतरू शकतील.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया रेल्वे संकेतस्थळाला भेट द्या किंवा रेल्वे अॅप डाउनलोड करा. उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी जागतिक दर्जाच्या, विश्वासार्ह आणि प्रवासी-मैत्रीपूर्ण सेवांचा पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे.









