मराठी चित्रपटातून देखील त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.घराची परिस्थिती बेताची असल्याने त्यानी संसाराला हातभार लावला . मोहित्याची मंजुळा, मर्दानी ,भाग्याची, मोलकरीण, आई पाहिजे, दोन बायका फजिती ऐका अशा चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने त्यानी नावाजलेल्या दिगदर्शक लोकांसोबत काम केले . बहुरंगी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.