---Advertisement---

ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू काळाच्या पडद्याआड

by team
---Advertisement---

ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधकार प्रभू यांचे आज पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या ८ ५ वर्षाच्या होत्या. प्रवास वर्णनकार म्हणून त्यांची पुस्तके प्रसिध्द होती.  

पुण्यातच जन्मलेल्या डॉ . प्रभू यांचे शिक्षण देखील पुण्यातच झाले. त्यांनी सुमारे तीन वर्ष लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले. प्रवास वर्णनकार म्हणून त्या प्रसिध्द होत्या. त्यांचे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक ‘माझं लंडन’ हे होते. मीना प्रभूंनी बाराहून अधिक प्रवासवर्णने लिहिली. त्यामध्ये त्यांनी जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन अशी माहिती दिली. त्यांची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. डॉ. मीना प्रभू यांची प्रवासवर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत.

मीना प्रभू यांनी गोव्यातील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-2010, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-2011, न. चिं. केळकर पुरस्कार-2012, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात 2017 मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.



Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment