इर्शाळवाडीतील पीडितांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय!

मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरातून पीडितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पीडितांच्या मदतीसाठी राज्यभरातुन तसेच राज्यातील मंत्री सुद्धा पुढे आले आहे.

राज्यातील सेवाभावी संस्था , काही सेलिब्रिटी आणि इतर मान्यवरांनी बाधितांना मदत देऊ केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचारीही पीडितांसाठी धावून आले आहेत. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इर्शाळवाडी घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी फडणवीसांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

 त्याबाबतचे पत्रही संबंधित कर्मचाऱ्यांनी फडणवीसांकडे सुपूर्द केले आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घडतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांचे कर्मचारीही महाराष्ट्राच्या जनतेप्रति कटिबद्ध असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.