---Advertisement---

…पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब

by team
---Advertisement---

पुणे : स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये मंगळवारी (दि. २५) रोजी दत्तात्रय गाडे याने एका सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी दत्तात्रय गाडे हा सध्या पोलीस कोठडीत आहे. या घृणास्पद घटनेनंतरही आरोपीला त्याच्या कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळत आहे. तसेच पीडित मुलीच्य संगनमताने हे शारीरिक संबंध ठेवले होते असा दावा गाडे याच्या वकिलांनी केला आहे. पीडितेचे व आरोपीचे आधीपासून ओळख होती असेही गाडे याच्या वकिलांनी म्हटले आहे.

दरम्यान,पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात मोठी माहिती समोर आली असून आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आले त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून न आलेले नाही.

पीडितेने पोलिसांकडे नोंदविला जबाब

आरोपी दत्ता गाडेने दोन वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने त्याला जीवे न मारण्याची विनंती केली होती. पीडितेने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात सांगितले कि, आरोपीने आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून घेऊन गेला, ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर तिने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने तिला बसच्या सीटवर ढकलून दिले. तिने मदतीसाठी आवाजही दिले, मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याल जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती. पीडिता घाबरली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याची बाब याप्रकरणात समोर आली. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना नराधमाकडे केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

पीडित तरुणी फलटणला निघाली होती. तिने काढलेले तिकीटही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आले आहे. दरम्यान दत्ता गाडेचा मोबाईल पोलिसांनी सापडला असून त्यात पीडितेचे आणि आरोपीचे याआधी कोणतेही संभाषण झाल्याचा पुरावा आढळलेला नाही. आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार देण्याचे सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment