जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारीचे १६ अर्ज दाखल करण्यात आले.
सन २००० पासून सिनेट वर अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचे वर्चस्व असून यावर्षी होणाऱ्या अधिसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख्रल करण्यात आले आहेत.
अर्ज दाखल केलेले उमेदवार
अमोल मराठे शिंदखेडा, अमोल पाटील भडगाव, दिनेश नाईक अमळनेर, सुनील निकम चाळीसगाव, नितीन झाल्टे जामनेर, नयना थोरात जळगाव, विलास बोरसे अमळनेर, दिनेश ठाकरे जळगाव, शुभांगी येवले जळगाव, स्वप्नाली काळे जळगाव, दिनेश खरात नंदुरबार, नितीन ठाकूर धुळे, दिनेश चव्हाण मुक्ताईनगर, सुनील नारखेडे जळगाव, सतीश मोरे जळगाव, निलेश झोपे जळगाव आणि वैभव बिंबे जळगाव यांचे अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाख्रल करते वेळी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक पाटील, अभाविप विभाग संघटन मंत्री शुभम स्वामी, महानगर मंत्री गितेश चौधरी यांच्यासह अभाविप व विद्यापीठ विकास मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.