विदर्भाला हवेच असे पर्यावरण संमेलन!

 

तरुण भारत लाईव्ह ।१३ जानेवारी २०२३।

– संजय रामगिरवार
Environment Summit विदर्भात प्रथमच पर्यावरण संमेलन होत आहे. तेही प्रदूषणाची सर्वाधिक पातळी गाठणा-या चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे, हा शुभसंकेत आहे. खरे तर वैदर्भीय जनतेला अशा ‘पर्यावरण संमेलना’ची नितांत गरज आहे. राजुरा या तालुकास्थानी त्याची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. Environment सरत्या वर्षात चंद्रपूरकरांना तब्बल ३३६ दिवस प्रदूषणाचा सामना करावा लागला. त्यातील १६४ दिवस थोडे कमी प्रदूषणात, १५० जास्त प्रदूषणात, तर २२ दिवस आरोग्यासाठी हानिकारक ठरावे, एवढ्या बिकट प्रदूषणात येथील जीव जगले. २०२१ मध्ये २३४ दिवस प्रदूषित आणि १०२ दिवस आरोग्यदायी होते. Environment मात्र, २०२२ मध्ये तब्बल ३३६ प्रदूषित आणि केवळ २९ दिवसच आरोग्यदायी ठरले, ही चिंतेची आणि तेवढ्याच चिंतनाची बाब स्काय वॉच संस्थेने उजागर केली आहेत. Environment इको-प्रो सारखी संस्थाही ढासळत्या पर्यावरणाविरुद्ध आवाज उठवत असते.
पण ज्यांना श्वसनाच्या, हृदयाच्या आणि त्वचेच्या विविध समस्या विळखा देत आहे, त्या जनतेला हा विषय गांभीर्याचा वाटतो का? कधी रस्त्यावर येण्याची, राजकारण्यांना जाब विचारण्याची तसदी त्यांनी घेतली का? Environment हा देखील तेवढ्याच काळजीचा विषय आहे. चंद्रपूर शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथील दोन ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे प्रदूषणाची नोंद घेतली जाते. सदर नोंद शासनाच्याच केंद्रीय यंत्रणेने घेतली असली, तरी घुग्गुस आणि राजुरा येथे त्यापेक्षाही जास्त प्रदूषण असल्याचा दावा स्काय वॉचचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी केला आहे. Environment MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तर येथील प्रदूषणाची पुरेशी आकडेवारीच उपलब्ध नाही, हे प्रदूषणापेक्षाही जास्त भयंकर आहे. अवतीभोवती संकट घोंगावत असताना शहामृग आपले डोके वाळूत लपवून घेतो, असे म्हणतात. Environment या प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही तसेच काहीसे झाले आहे. अशात शुक्रवारी राजु-याला पर्यावरणावर आधारित पहिले संमेलन पार पडत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.
त्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे आणि राष्ट्रीय जागरूकता आणि विकास अभियानाचे आभार मानले पाहिजेत. Environment तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संमेलनासाठी आयोजकांना प्रोत्साहित केले म्हणून त्यांचेही कौतुक केले पाहिजे. मुनगंटीवार यांच्याच हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर अध्यक्षस्थानी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र भूषण सुयोग धस यांच्यासह जिल्ह्यातील जवळजवळ सा-याच राजकीय पक्षांचे पुढारी अतिथींच्या यादीत आहेत. त्यामुळे विदर्भातील प्रदूषणाची धग त्यांनाही जाणवेल अशी अपेक्षा करू या. Environment ज्येष्ठ सिने अभिनेता व नेफडो संस्थेचे प्रवर्तक जयराज नायर, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ आदींचीही उपस्थिती राहणार आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची हजेरीही यावेळी असेल. त्यामुळे या संमेलनाकडून विदर्भाला मोठ्या अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. Environment परंतु, या संमेलनात पर्यावरण संवर्धनासाठीचा ठोस कार्यक्रम आखला जाईल का, कुठला कृतिशील आराखडा तयार होईल का, हे आत्ताच सांगता येणार नाही.
पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करीत असतानाच काही महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्याचा कार्यक्रम समारोपीय सत्रात असायला हवा होता. तो दिसत नाही. Environment पर्यावरण संवर्धनाविषयी केवळ चिंता व्यक्त करण्यापुरते कार्यक्रम याआधीही बरेच झाले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी अनेक आराखडे तयार केले आहेत. जे धूळ खात पडले आहेत. चंद्रपूरसारख्या एकाच जिल्ह्यात, त्यातही जिल्ह्यातील एकाच टोकाला उद्योगांची गर्दी झाली आहे. त्यातून होणा-या प्रदूषणाने जनता बेजार आहे. Environment येणा-या काळात पुन्हा याच भागात औद्योगिक क्रांती व्हावी, अशी अपेक्षा एमआयडीसीच्या शाखा करीत आहेत. स्थानिक राजकीय मंडळीही लहानमोठ्या उद्योगांमध्ये आपला पैसा गुंतवत आहेत. पण कुणीही त्यापासून होणा-या प्रदूषणावर चकार शब्द काढायला तयार नाही. Environment अशावेळी राजु-यात उचलले जाणारे पर्यावरण संमेलनाचे पहिले पाऊल लहान जरी असले तरी ते ठामपणे टाकले जावे, पर्यावरणवादी, उद्योजक आणि राजकारण्यांनी ते गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा करणे गैर नक्कीच नाही.