VIDEO : जळगावात बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच

जळगाव : गेले दहा दिवस गणेशोत्सवात लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा, भक्ती आणि सेवा केल्यावर आज गणरायाला निरोप दिला जात आहे. जळगावात सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. जळगाव शहरातील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अर्थात भाविकांनी आपल्या राजाला शेवटचं डोळेभरून पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.

सध्या जळगाव शहरातील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातील शिवतीर्थ  चौक ते टॉवर चौक परिसरात जिकडे नजर तिकडे फक्त अन् फक्त गणेशभक्तच पाहायला मिळत आहे.

तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या मिरवणुका हळूहळू विसर्जनस्थळी मार्गस्थ होत आहे.

विसर्जन मिरवणुकींवर सीसीटीव्हींची नजर
जळगाव शहरात विसर्जन मार्गावर ८३ सीसीटीव्ही कॅमेरे व ५ ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे. भुसावळ येथील जामा मशिद या परिसरात नगरपालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. रावेर येथे मुख्य मिरवणुकीच्या मार्गात व तसेच संवेदनशील परिसातत पूर्वीपासूनच कॅमेरे लावण्यात आले आहेत.