video # भीषण अपघातानंतर 8 जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. नैनिताल हायवेवर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याला एसएसपींनीही दुजोरा दिला आहे.

अपघाताबाबत माहिती देताना बरेलीचे एसएसपी सुशील चंद्रभान म्हणाले, भोजीपुराजवळ महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकला कार धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. एका लहान मुलासह 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.

हा अपघात बरेलीच्या भोजीपुरा भागात झाला. येथे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर एका डंपरला धडक दिल्याने कारने पेट घेतला. कारमधील प्रवासी लग्न सोहळा आटोपूनयेत होते. या अपघातात कारमधील सर्व 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासन तेथे पोहोचले आणि त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर आग विझवण्यात आली आणि कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ आटोपून लग्नातील सर्व पाहुणे बाहेरी गावी परतत होते. परतत असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डभौरा गावात अचानक कारचा टायर फुटला आणि कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या पलीकडे जाऊन समोरून येणाऱ्या डंपरला धडकली.

 

घटनेची माहिती मिळताच एसएसपी सुशील चंद्रभानही घटनास्थळी पोहोचले. काही वेळाने सीओ चमनही तेथे पोहोचले आणि वाहतूक सुरळीत झाली. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. वृत्त लिहेपर्यंत मृत्यू झालेल्या सर्वांची ओळख पटलेली नाही.