नागपूर : येथील एका पोलिस चौकीत दोन पोलिसांचा जुगार आणि धुम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला होता. लोकांनी व्हिडिओच्या आधारे दोन्ही पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली होती. लोकांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचवेळी आता दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
व्हिडिओच्या आधारे दोन्ही पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदनही जारी करण्यात आले आहे. या संदर्भात एका वृत्तसंस्थेला माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुना काँप्टी रोडवर असलेल्या कळमना पोलिस ठाण्यातील गैरव्यवहाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (झोन-5) निकेतन कदम यांनी मनोज घाडगे आणि भूषण साकडे यांना निलंबित केले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दोन पोलिस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत. त्यापैकी एक जण गणवेशात धुम्रपान करत होता मात्र,या दोन पोलिसांचा व्हिडिओ कोणी बनवला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
त्याचबरोबर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपूरसह राज्यातील इतर पोलीस ठाण्यांवर पोलीस खाते लक्ष ठेवत असल्याचा दावा केला जात आहे. असे कृत्य करताना कोणी पोलीस आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.