---Advertisement---

दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान फेल; जळगावात पहिल्याच पेपरला सर्रास कॉपीचे विडीओ व्हायरल

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मराठी विषयाचा पेपर पार पडला. मात्र, जळगावमध्ये या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या प्रकारानंतर जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने या व्हिडिओंची चौकशी सुरू केली आहे.

शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सर्रासपणे कॉपी पुरवली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. परीक्षेच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे खुलेआम कॉपी होत असल्याचे समोर आल्याने शिक्षण मंडळाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा : पती तुरुंगात असताना सोनालीचे जुळले दुसऱ्याशी सूत, पण प्रियकराने तिचा असा केला शेवट

माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी परीक्षेसाठी विशेष तयारी केल्याचा दावा केला होता. परीक्षेला गालबोट लागू नये म्हणून कॉपीमुक्ती अभियान राबविण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांवर कॉपीचा सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसून आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही जण परीक्षा हॉलच्या बाहेरून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना स्पष्ट दिसत आहेत.

प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा

या प्रकारानंतर जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने या व्हिडिओंची चौकशी सुरू केली आहे. “व्हिडिओ नेमके कोणत्या केंद्राचे आहेत, याचा तपास सुरू असून काही तथ्य असल्यास कारवाई केली जाईल,” असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान, दरवर्षी दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीबाबत तक्रारी येत असतात. मात्र, यंदा पहिल्याच दिवशी असे प्रकार समोर आल्याने शिक्षण मंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. सर्रासपणे सुरू असलेल्या या प्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment