मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय, माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच अशी ठाम भूमिका त्यांनी भेटीनंतर घेतली आहे.
दरम्यान, विजय शिवतारेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. या भेटीनंतर शिवतारे म्हणाले, ” बारामतीच्या उमेदवारीबाबत मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.