विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

जळगाव : विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदवसानिमित्त हौसिंग सोसायटी येथे वृक्षारोपण अभियानास उत्साहाच्या वातावरणात सुरूवात करण्यात आली.

भाजपाचे जळगाव लोकसभाक्षेत्र प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, नगरसेवक आबा कापसे, विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव, उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, नितीन पाटील, हरिष देशमुख,रविंद्र पवार,रविंद्र पवार,रविंद्र जगताप,निलेश बोरसे, दीपक पाटील, हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. विजया केसरी प्रतिष्ठान च्या कार्यालयाजवळ आणि हौसिंग सोसायटी जवळ वृक्षारोपण करण्यात आले असून, कडू निंबाचे पाच फुटाचे रोपे आणि त्यास संरक्षण म्हणुन ट्री गार्ड देखील यावेळी लावण्यात आले. यावेळी विनोद पाटील,भोजराज पाटील, रविंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

“झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे.माननीय गिरीष भाऊ यांचे जन्मदिनी पर्यावरण पूरक असा हा उपक्रम आम्ही विजया केसरी प्रतिष्ठान चे वतीने प्रारंभ केला असून, लोकांच्या सहभागातून ह्या उपक्रमातून शेकडो वृक्ष रोपण करण्याचा आमचा मानस आहे. ते वृक्ष वाढविण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. ”
अविनाश पाटील जाधव , अध्यक्ष विजया केसरी प्रतिष्ठान, जळगाव.