---Advertisement---

मंदिरात चोरी करणार्‍याला ग्रामस्थांनी दिला चोप अन्..

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । चोरी करताना आढळून आल्याने नागिरकांनी चोप दिल्याची बातमी तुम्ही वाचतच असाल अशी एक बातमी नवापूर मध्ये घडली आहे. नवापूर शहरातील नवीन महादेव मंदिरात चोरी करणार्‍या चोरट्याला रंगेहाथ पडकून चोप दिला आणि पोलीसांच्या स्वाधीन केले.

सूत्रानुसार, नवापूर शहरातील नवीन महादेव मंदिरात दि.२ डिसेंबर रोजी एक भिक्षुकाच्या वेशात असलेल्या चोरट्याने मंदिरातील दान पेटी असलेला डब्बा लंपास केला होता. सदर चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती.

फुटेज पाहून मंदिर परिसरातील नागरिक सकाळी चोरट्याच्या शोधात होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पुन्हा चोरट्याने मंदिरात प्रवेश करताच स्थानिक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडले. स्थानिकांचा रोष बघता चोरट्याला चांगलाच चोप देण्यात आला व पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment