नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिललगावातुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका मजुराची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्वीच्या शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मजुरावर धारदार कुऱ्हाडीनं वार करत हत्या केल्याची घटना सामोर आली आहे.
धडगाव तालुक्यातील बिललगावात घडलेल्या धक्कादायक प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब
प्राथमिक माहितीनुसार, जुन्या शेतीच्या वादातून मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फाड्या खाज्या पावरा (वय वर्ष ४०) असं मृत मजूरच नाव आहे. हा मजूर सकाळी नदीवर आंघोळ करण्यासाठीअसता त्या ठिकाणी काही गावकरी आले. पूर्वी झालेल्या शेतीच्या वादाचा राग अजूनही त्या गावकऱ्यांच्या मनात होता. रागाच्या भरात गावकऱ्यांनी मजुराला घेरत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. नंतर धारदार कुऱ्हाडीनं जोरात हल्ला केला. या हल्ल्यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. मजुराचा मृतदेह नदीजवळच फेकून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मृत्युदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.