---Advertisement---
नशिराबाद गावातील प्रत्येक घरांमध्ये स्मार्ट मिटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तथापि संपूर्ण गावातील ग्रामस्थ स्मार्ट मिटर बसविण्यास तिव्र विरोध करत असून खालील कारणांमुळे हे मीटर बसवू नयेत अशी आमची विनंती आहे.
स्मार्ट मीटर संदर्भात शासनाकडून कोणताही स्पष्ट आदेश किंवा निर्णय प्रसारित करण्यात आलेला नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत ही जबरदस्तीने बसवली जाणारी यंत्रणा कायदेशीररित्या शंकास्पद आहे. तसेच या स्मार्ट मीटरमुळे नागरीकांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडत असून, अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर विज बिलात अनपेक्षित वाढ झाल्याचे आढळून आले आहे. आणि नशिराबाद हे एक शेतकरी प्रधान व सामान्य लोकांचे गाव आहे. येथे बहुतांश लोक हातावर पोट भरणारे असून, त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक ठरेल. गावात जनजागृती न करता व लोकांचा स्पष्ट विरोध असूनही मीटर बसवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात येऊ नये.
जर पुढील १५ दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही, तर दि.१० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता संपूर्ण नशिराबाद ग्रामस्थांच्या वतीने नशिराबाद शहर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल व त्या दिवशी प्रतिकात्मक स्वरूपात स्मार्ट मीटरची होळी करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी विज वितरण महामंडळाची राहील अशे आव्हान ग्रामस्थांनी केले आहे.
आपण या गंभीर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत योग्य ती कार्यवाही कराल यांचे निवेदन स्वीकारताना उप कार्यकारी अधिकारी अजय बसू, उप अभियंता पवन वाघुळदे, यांना देण्यात आले यावेळी माजी सरपंच पंकज महाजन, निलेश रोटे, राजेश कोष्टी, विनोद भोळे, देवेंद्र पाटील,केवल पाटील, प्रसाद राने, चंदन नारखेडे, संतोष नारखेडे, किशोर नारखेडे, चंद्रशेखर पाटील,कल्पेश पाटील, आदी ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थिती होते









