जळगाव : मान्सून कालावधी सुरू असून पावसाचे प्रमाण कमी अधिक होत आहे. यातच विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर तापी व पूर्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यानुसार जळगाव जिल्ह्याला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तापी व हातूनर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येऊ शकतो. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात सर्व यंत्रणा तत्पर ठेवल्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नद्या, उपनद्या धरणे,तलाव, कालवे, खदाणी, नाले, धबधबे,येथे पुराचे पाणी आणि अतिवृष्टी, ढगफुटी मुळे पाण्याची पातळी वाढून नदीकाठावरील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागनिहाय नियंत्रण कक्ष यांना दक्ष राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तसेच तालुका निहाय शोध बचाव साहित्य, रबर बोट, बचाव पथकातील आपदा मित्र ,पट्टीचे पोहणारे यांनी ही सतर्क राहणे मित्रांनी सतर्क राहण्याचे निर्देश आहेत.
आपत्कालीन शोध मदत व बचाव कार्यासाठी मदत लागल्यास कृपया 9373789064 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.