---Advertisement---
आसाममधील धुबरी जिल्ह्यातील एका मंदिराबाहेर गोमांस आढळल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. हिंदू समाजाने विरोध करीत निदर्शने केली, तर दुसऱ्या गटानेदेखील आंदोलन केल्याने दोन गटात संघर्ष झाला. यात दहापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. पोलिसांनी तणान पसरविणाऱ्या ३८ जणांना अटक केली, तर राज्य सरकारने हिंसा पसरविणान्यांना दिसताच गोळी घालण्याचा आदेश दिला आहे. धुबरी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी शहरातील एका हनुमान मंदिराबाहेर गोमांस आढळले. दुसऱ्या दिवशी गुरुवारीदेखील मंदिराबाहेर पुन्हा मांस आढळून आल्याने हिंदू नागरिकांनी निदर्शने केली. दुसऱ्या गटानेदेखील आंदोलन केल्याने तणाव वाढला. यावेळी दोन गटात संघर्ष झाला.
जिल्हाधिका-यांच्या आदेशाने शहरात संचारबंदी लागू केली, राज्य सरकारने धुबरीचे पोलिस अधीक्षक नवीन सिंह यांची बदली तत्काळ बदली केली. नवीन सिंह यांच्या जागी हैलाकांडी एसएसपी लीना डोले यांची नियुक्ती करण्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, पोलिस कारवाईत आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे.
मी धुबरी येथील हनुमान मंदिराला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसा भटकविणाऱ्यांवर अटक करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान नबीना बांगला नावाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हिंसा घडविण्यासाठी हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासा समोर आले. सध्या या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.