जळगाव : आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, महिलेवर तीन जणांनी नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या अत्याचार केला. याप्रकरणी रविवार, २३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील एका भागात २७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान, महिला आंघोळ करतानाचे फोटो व व्हिडिओ सचिन किशोर भाट (रा. नंदुरबार), बंटी दीपक नेतले (रा. दोंडाईचा) आणि निलेश युवराज तमाईचे (रा. नंदुरबार) या तिघांनी काढले.
त्यानंतर 4 डिसेंबर 2022 ते 6 जून 2024 च्या दरम्यान, महिलेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, वेळोवेळी नैसर्गिक आणि अनैसर्गिकरित्या तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, पीडितेला हा प्रकार सहन न झाल्याने तिने थेट एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवार, २३ रोजी रात्री १० वाजता सचिन किशोर भाट रा. नंदुरबार, बंटी दीपक नेतले रा. दोंडाईचा आणि निलेश युवराज तमाईचे रा. नंदुरबार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.