Badlapur Sexual Harassment : भाजपा धुळे महानगरतर्फे तीव्र आंदोलन, आरोपीला फाशीची मागणी

धुळे : बदलापुर येथे गेल्या 9 ऑगस्ट रोजी शालेय बालीकेवर झालेल्या अत्याचारा विरोधात तीव्र निषेध करण्यासाठी तसेच त्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी आज भाजपा धुळे महानगर शाखेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात झांसी राणी चौक येथे करण्यात आले.

यावेळी आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यासह या गंभीर आणि लाछंनास्पद विषयावर कुठल्याळी राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण न करता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पीडिता व त्यांच्या परिवारा सोबत सहानुभुतीने सर्व पक्षांनी उभे राहुन राज्य सरकारला अत्याचाऱ्यांना कडक शासन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपा धुळे महानगर विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल, मा. महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल, संदीप बैसाणे, ज्येष्ठ नेते भिमसिंग राजपुत, महेश मुळे, विजय पाच्छापुरकर, जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, भाजपा सोशल मिडीया संयोजक पवन जाजु, सुनिल कपील, प्रकाश उबाळे, शेखर कुलकर्णी, बिपीनचंद्र रोकडे, मनिषा ठाकुर, शंकुतला जाधव, उमा कोळवले, वंदना थोरात, वंदना सुर्यवंशी, सुलोचना चौधरी, मोहिनी धात्रक, सुनिता सोनार, आरती पवा, निषा चौबे, रंजना पाटील, मिनल अग्रवाल, पुनम सिंह, आरती दिलीप महाले, तुषार भागवत, भुषण गवळी, पंकज धात्रक, गोपाल ईश्वर चौधरी, प्रकाश पाटील, जयवंत वानखेडकर, अमोल मासुळे, सुहास अंपळकर, प्रथमेश गांधी, सुलोचना चौधरी, पत्रकार राजेंद्र सोनार, सागर कोडगीर, प्रशांत बागुल, योगिता बागुल, राजेश पवार, अरुण पवार, सुबोध पाटील, भिलेश खेडकर, भगवान देवरे, किरण चौधरी, जिवन शेंडगे, कमलाकर पाटील, शिवाजीराव काकडे, अनिल थोरात, आनंदा चौधरी, आदींसह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, व लोकप्रतिनीधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.