विवेक ओबेरॉय अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याचा व्यवसाय. विवेकने त्याच्या बिझनेसबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना कर्ज देण्याच्या व्यवसायाबाबत त्यांनी नुकताच मोठा खुलासा केला आहे. फ्रँचायझी इंडियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने हा खुलासा केला आहे. विवेकने सांगितले की, त्याने एक स्टार्टअप सुरू केला, जो एज्युकेशन फी फायनान्सिंगशी संबंधित होता. त्याने सांगितले कि या व्यवसायायत मालमत्ता जोखीम नव्हती.
हा स्टार्टअप वेगाने वाढला आणि B2B नेटवर्कद्वारे तो 12,000 शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचू शकला. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आणि सुमारे ४५ लाख विद्यार्थ्यांचा डेटा गोळा केला. या डेटामुळे त्याचा व्यवसाय आणखी मजबूत झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आता त्यांच्या कंपनीची किंमत सुमारे ₹ 3400 कोटी आहे.
इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास
विवेक ओबेरॉय म्हणाले की, तो त्याच्या कंपनीसाठी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो. तो संपूर्ण टीमसोबत इकॉनॉमी क्लासमध्ये उड्डाण करतो. विवेकने त्याच्या कंपनीच्या सामाजिक प्रभावाबद्दलही सांगितले.
अभिनय ही खरी आवड
तळागाळापासून वरपर्यंत आपल्या देशात सकारात्मक बदल घडवून आणणारे काम करण्यात त्याला आनंद आहे. आपल्या कामाचा समाजावर चांगला प्रभाव पडावा अशी त्याची इच्छा आहे. शेवटी विवेक म्हणाला की त्याच्या व्यवसायामुळे त्याची अभिनयाची आवड आणखी वाढली आहे. हा व्यवसाय त्याला स्वातंत्र्य देतो ज्यामुळे तो ज्या कथा सांगू इच्छितो त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. अभिनय हीच आपली खरी आवड असल्याचंही तो म्हणाला.