काँग्रेसविरोधात संतापाचा सूर! प्रणव मुखर्जींच्या मुलीचे टीकास्त्र

#image_title

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या आर्थीक क्रांतीचा पाया रचला. जगभरातल्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा कार्यकाळाचे स्मरण करत त्यांना मानवंदना वाहिली आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाचा दुजाभाव समोर आला आहे, आणि याची पोलखोल केली माजी राष्ट्रपची प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती केली आहे, की भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतयात्रा जिथे पार पडणार आहे, त्याच स्थळावर मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्यात यावे, अशी विनंती केली आहे. यावरूनच आता काँग्रेस सरकारच्या दुजाभावावर ताशेरे ओढले जात आहेत. शर्मीष्ठा मुखर्जी यांनी म्हटले की ज्या वेळेस प्रणब मुखर्जी वारले, त्यावेळेस, काँग्रेस पक्षाने साधी शोकसभा सुद्घा बोलवली नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटले की अशी शोकसभा राष्ट्रपतींसाठी केली जात नाही. एवढेच नाही तर, अशा प्रकारे ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करण्याची आहे हे नंतर मुर्खीजी यांच्या लक्ष्यात आले. शर्मिष्ठा यांनी म्हटले की ” बाबांच्या डायरीत मला नोंद सापडली ज्यात असे लक्ष्यात आले की के आर नारायण यांच्यासाठी मात्र, शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, तर दुसऱ्या बाजूला प्रणव मुखर्जी यांनी स्वता: शोक संदेश लिहीला होता.” मग प्रणव मुखर्जी यांच्यासोबत हा दुजाभाव का केला गेला असा सवाल आता माध्यमांमध्ये विचारला जातोय.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस यांनी पी व्ही नरसिंहराव राव यांना कशा प्रकारची वागणूक दिली यावर आता समाजमाध्यमांवर चर्चा होत आहे. काँग्रेसने पी व्ही नरसिंहराव यांचे स्मृतीस्थळ बनवले नाही. इतकेच नव्हे तर काँग्रेस कमिटीच्या ऑफीसमध्ये देखील त्यांचे पार्थीव आणले गेले नव्हते.