अग्रलेख
Gujrat Polls गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. ५ डिसेंबरला गुजरातमध्ये दुस-या टप्प्यातील मतदान पार पडले आणि मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. मतदानाची प्रक्रिया पार पडताच exit polls मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष पुढे आले आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल, याचे संकेत मिळाले. Gujrat Polls नुसतीच सत्तेत येईल असे नव्हे, तर २०१७ पेक्षाही जास्त जागा मिळवत ही सत्ता मिळेल, असे भाकीत वर्तविण्यात आल्याने राहुुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा करणा-या काँग्रेसची काय स्थिती होणार, हे स्पष्ट झाले आहे. Gujrat Polls आम आदमी पार्टीचे भूत मतदारांच्या मानगुटीवर बसविण्याचे कारस्थान ज्यांनी केले, त्यांचे बुरखे टराटरा फाटले आहेत. गुजरातेत आम आदमी पार्टी बाजी मारेल, भाजपाच्या विजयाच्या मार्गात आडवी येईल, असेही सांगण्यात आले होते. Gujrat Polls पण, विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांचे मतदानोत्तर जे निष्कर्ष पुढे आले आहेत, ते पाहता राजकीय पंडितांना चपराक बसली आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.
काही राजकीय पंडित, वृत्तवाहिन्यांनी आम आदमी पार्टीची सुपारी घेतल्यासारखेच काम केले, हेही आता दिसून येत आहे आणि उद्या, ८ डिसेंबरला निकाल जाहीर होतील, तेव्हा ही बाब प्रत्यक्ष सिद्ध झालेली असेल, यात शंका नाही. Gujrat Polls गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होईल, आम आदमी पार्टीकडे लोकांचा कल वाढतो आहे, हार्दिक पटेल वगैरे फॅक्टर चालणार नाही, काँग्रेसलाही ब-यापैकी जागा मिळतील, अशा प्रकारचे अनेक अंदाज राजकीय पंडितांनी व्यक्त केले होते. Gujrat Polls पण, जे काही निष्कर्ष आता समोर आले आहेत, ते खरे ठरतील असे मानले तर भाजपाची दमदार वापसी होणार, हे स्पष्ट झाले आहे. विधानसभेची निवडणूक हिमाचल प्रदेशातही होती. पण, संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते गुजरातकडेच! Gujrat Polls त्याला कारणही आहे. कित्येक वर्षांपासून गुजरातेत भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. पंतप्रधान मोदी हे १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता आठ वर्षे ते पंतप्रधान आहेत. Gujrat Polls त्यांनी आणि भाजपातल्या त्यांच्या सहका-यांनी गुजरातचा जो विकास केला, त्यामुळे अन्य कुणाला निवडून देण्याचा विचारही जनता करीत नाही, हे दिसून आले आहे.
विकासाचा गुजरात पॅटर्न देशभर प्रसिद्ध आहे. गुजरातेतले दोन नेते आज राष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारे नेतृत्व करीत आहेत, त्याचा गुजराती बांधवांना अभिमान असणे आणि त्याच भावनेतून त्यांनी भाजपाला कौल देणे स्वाभाविक मानले पाहिजे. Gujrat Polls यंदाच्या निवडणुकीच्या फार आधीपासूनच काही वृत्तवाहिन्या आणि राजकीय पंडितांनी भाजपाच्या पराभवाच्या कंड्या पिकवण्याचे काम सुरू केले होते. पण, जनतेचा विश्वास संपादन करणारी भाजपा आपल्या विजयाबाबत आश्वस्त होती. केलेल्या कामांवर आणि स्वत:वर दृढ विश्वास असल्याने भाजपाचे नेते विजयाबाबत निश्चिंत होते. एवढा प्रदीर्घ काळ एकाच राज्यात सत्ता मिळविणे सोपे नाही. देशावर सर्वाधिक काळ राज्य करणा-या काँग्रेसलाही हे शक्य झाले नाही. पण, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी अशा भावनेने काम करणा-या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची फौज असणा-या भाजपाला हे सहज शक्य होत आहे, यातच सगळे आले. Gujrat Polls पाच वर्षांनी सत्ताबदल करायचा हा हिमाचल प्रदेशचा स्वभाव आहे. त्यामुळे तिथे भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत आली तर आश्चर्य वाटायला नको. हिमाचल प्रदेशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनंतर व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपा सत्तेतून जाईलच, असे ठामपणे सांगता येत नाही.
भाजपाने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केलेली विकास कामे जनतेला आवडली असतील तर परंपरा मोडीत काढत मतदार भाजपालाच सत्तेत बसवतील, याचीही शक्यता आहेच. कारण, काँग्रेसच सत्तेत येईल, असे ठामपणे कुणीही म्हटलेले नाही. Gujrat Polls आम आदमी हिमाचलात दमदार कामगिरी करणार, भाजपाला पाणी पाजणार, असेही भाकीत करण्यात आले होते. पण, आता असे दिसते आहे की, आम आदमी पार्टी स्पर्धेतही कुठे नाही. उगाच बागुलबुवा निर्माण करीत वस्तुस्थिती दडपण्याचे जे प्रयत्न झालेत, त्याने भाजपा विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे. हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्ताबदल हा होत असतो. पण, यावेळी ती परंपरा मोडीतही निघू शकते. Gujrat Polls असे जर झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे, हे सिद्ध होईल. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. Gujrat Polls गुजरातेत जर भाजपाला सत्ता मिळू शकली नाही तर २०२४ साली लोकसभेतही भाजपाला अपयशाचाच सामना करावा लागेल, असे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेल्याचे आपण पाहिले.
Gujrat Polls पण, मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता चित्र स्पष्ट होताना दिसते आहे आणि उद्या ते पूर्ण स्पष्ट होईल तेव्हा २०२४ साली काय होणार, याचेही सुस्पष्ट संकेत मिळतील. मग, कारण नसताना भाजपाच्या पराभवाची कामना करताना इतरांची सुपारी घेणाèयांचे पडलेले चेहरेही पाहायला मिळतील. आम आदमी पार्टीने दिल्लीतल्या जनतेला ज्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या, तशाच गुजरात आणि हिमाचलातल्या जनतेला देणार, असे आश्वासन दिले होते. पण, या दोन्ही राज्यांमधील जनता या फुकटच्या आश्वासनांना बळी पडलेली दिसत नाही. Gujrat Polls पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने जी प्रगती केली, ती विलक्षण असल्याने मतदारांना आवडली व त्यांनी भाजपाला पसंती दिली तर नवल काहीच नाही. जे मतदारांच्या मनात तेच भाजपा-मोदींच्या प्रत्यक्ष कृतीत असे घडत असल्याने गुजरातसोबतच हिमाचलातही भाजपाला सत्ता मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
२०१४ सालापासून एकामागोमाग एक पराभव होत असतानाही काँग्रेसच्या स्वभावात सुधारणा होताना दिसत नाही. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत मग्न आहेत. निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाही त्यांनी यात्रा सुरूच ठेवली होती. प्रचारात ते फार कमी सहभागी झाले. ज्या काही थोड्या सभा त्यांनी गुजरातमध्ये घेतल्या त्यात त्यांनी गुजरातचे सुपुत्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. Gujrat Polls ही बाब गुजराती बांधवांना आवडणारी नव्हतीच मुळात! त्यामुळे गुजरातची जनता काँग्रेसचा स्वीकार करेल याची कसलीही शक्यता नव्हती. मोदींवर अश्लाघ्य शब्दांत टीका करण्याची एकही संधी न सोडणा-या राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची अपरिमित हानी केली आहे. गांधी घराण्याला खूश करण्यासाठी ज्या नेत्यांनी राहुल गांधी यांचीच री ओढली, त्यांनीही पक्षाला पराभवाकडे नेण्याचे काम केले आहे. Gujrat Polls सततच्या पराभवातून काही शिकायचे, कारणे शोधायची, उपाय शोधायचे आणि नंतर निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवायची, हा प्रकार काँग्रेसमध्ये दिसतच नाही. याउलट, विजय मिळो की पराजय, भाजपात सातत्याने चिंतन-मंथन केले जाते. Gujrat Polls जिंकलो तर कोणत्या घटकांमुळे आणि हारलो तर कोणत्या कारणांमुळे, याचे चिंतन अतिशय गांभीर्याने भाजपाकडून केले जाते. त्यामुळे जिंकल्यानंतर उन्माद चढत नाही आणि पराजयाने मनोबल खच्ची होत नाही. पुढली लढाई लढण्याची रणनीती तयार करताना अशा प्रकारचे चिंतन -मंथन पक्षाला उपयोगी पडते.
नेमका याच बाबीचा अभाव काँग्रेस पक्षात दिसतो, वारंवार दिसतो. एकामागोमाग अनेक पराभव होत असतानाही हा पक्ष अहंकारी वृृत्तीने वागत जनतेला गृहीत धरतो आहे आणि पराभवाची मालिका तयार करतो आहे, हे त्या पक्षातले कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही. Gujrat Polls राहुल गांधी सध्या मध्यप्रदेशात भारत जोडो यात्रा करताहेत. कालपरवाची घटना आहे. ते जात असलेल्या मार्गावर जमलेल्या असंख्य लोकांनी मोदी मोदी असे नारे दिले. त्याला राहुल गांधी यांनी ‘फ्लाईंग किस’ देत प्रतिसाद दिला असला, तरी असे नारे जेव्हा दिले जातात तेव्हा आपण मोदींवर जी टीका करतो, ती आपल्या पक्षासाठी हानिकारक ठरू शकते, याचा अंदाज त्यांना यायला हवा. पण, तसे होताना दिसत नाही. Gujrat Polls ते अजून अजून मोदींवर धारदार टीका करतात. काँग्रेसच्या विजयाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर जर कोणता असेल तर त्या पक्षातील नेत्यांची नकारात्मक भूमिका. सातत्याने भाजपा, संघ, मोदी यांच्यावर टीका करून काहीही साध्य होणार नाही, हे वारंवार सिद्ध झाले असतानाही राहुल गांधी व त्यांचे सहकारी सुधरायला तयार नाहीत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुुकीत काँग्रेसला यश मिळेल, याचीही अपेक्षा कुणी करू नये. Gujrat Polls स्वत:च्या पराभवाचा पाया भक्कमपणे रचण्याचा निर्धार ज्या पक्षाने आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी केला असेल, ‘त्या’ पक्षाला मतदार कौल देतीलच कसे?