असोदा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

असोदा :  सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधारित मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने मतदान जनजागृती पर गावात रॅली काढण्यात येऊन नागरिकात मतदानासाठी मतदान केंद्रावर येण्याकरिता आवाहन करण्यात आले. रॅलीत विद्यार्थी, विद्यार्थिनी मतदान जनजागृती पर फलक घेऊन सहभागी होते.  याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील सर्व शिक्षक सहभागी होते. विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. जागरूक मतदार लोकशाहीचा आधार, लोकशाहीचे एकच अनुष्ठान करा आपले मतदान यासारख्या घोषणा व मतदार राजा जागरूक हो असा संदेश देत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.